कृषी क्षेत्रात ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षणाची योजना प्रश्नावली
१. या योजनेत सहभागी होण्यासाठी स्वत:कडे ड्रोन असणे गरजेचे आहे का?
नाही.
२. या योजनेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची गरज का आहे?
होय. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा तांत्रिक आणि कायदेशीर माहितीचा असल्याने किमान शैक्षणिक अर्हता किमान १० वी उत्तीर्ण आहे.
३. अर्जदाराकडे स्वत:कडे शेती नसेल तर प्रशिक्षण घेता येईल का?
होय. प्रशिक्षणासाठी स्वत:कडे शेती असणे बंधनकारक नाही. मात्र, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
४. काही कारणाने प्रशिक्षण पूर्ण करू न शकल्यास योजनेचा लाभ मिळेल का?
नाही.
५. प्रशिक्षणानंतर ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल का?
नाही. ही योजना फक्त प्रशिक्षणासाठी मर्यादित आहे.
६. स्थानिक उमेदवार किंवा ज्यांची स्वत:ची निवास व भोजनाची सोय आहे त्यांना त्यासाठीचे अर्थसहाय्य मिळेल का?
नाही.
७. असाच कोर्स इतर संस्थांमध्ये केल्यास अमृतकडून लाभ मिळेल का?
नाही.
<